ऑनलाईन फॉर्म गाई म्हशी गट वाटप योजना महाराष्ट्र | Gai Mhashi Vatap Yojana 2022

Gai Mhashi Vatap Yojana 2022 : राज्यात दुध उत्पादनास चालना देण्यासाठी सहा/ चार/ दोन दुधाळ संकरीत गाई/ म्हशींचे गट वाटप करणे या नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व जिल्हास्तरीय आदिवासी क्षेत्र उपयोजनांचे यापूर्वीचे शासन निर्णय अधिक्रमित करून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

Gai Mhashi Vatap Yojana 2022

सदर योजनेअंतर्गत वाटप करावयाच्या दुधाळ जनावरांमध्ये देशी जातीच्या दुधाळ गाईंचा समावेश करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

या योजनेअंतर्गत महिला बचत गट, अल्पभूधारक शेतकरी, तसेच सुशिक्षित बेरोजगार यांना या योजनेत चा प्राधान्याने लाभ घेण्यात येणार आहे घेता येणार आहे. ही योजना राज्याच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत संकरित आणि देशी गाई यांचे वाटप करण्यात येणार आहे.


महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना २०२२

Gai Mhashi Vatap Yojana 2022 काय आहे?

राज्यात दुग्धोत्पादनास चालना देण्यासाठी राज्यस्तरीय सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व जिल्हास्तरीय आदिवासी क्षेत्र उपयोजने अंतर्गत वाटप करावयाच्या सहा/चार/ दोन संकरीत गाई/ म्हशींचे गट वाटप करणे या योजना मध्ये देशी दुधाळ गाईचा समावेश आहे.

खालील दिलेल्या गायीचा यामध्ये समावेश आहे:-

  • गीर
  • सहिवाल
  • रेड सिंधी
  • राठी
  • थारपारकर देवणी
  • लाल कंधारी
  • गवळाऊ
  • डांगी

लाभार्थी निवडीचे निकष प्राधान्यक्रम

  • महिला बचत गट
  • अल्प भूधारक (१ हेक्टर ते २ हेक्टर पर्यंतचे भूधारक )
  • सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोगार केंद्रात नोंद असलेले )

एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील.

अ.क्र.बाब२ जनावरांचा गट (रक्कम रुपयात )
संकरित गाई /म्हशी चा गट – प्रति गाय /म्हैस रु. ४०,०००/- प्रमाणे८०,०००
जनावरांसाठी गोठा
स्वयंचलित चारा कटाई यंत्र
खाद्य साठविण्यासाठी शेड
५.७५ टक्के (अधिक १०.०३ टक्के सेवाकर ) दराने ३ वर्षाचा विमा५,०६१
एकूण प्रकल्प किंमत८५,०६१

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील .

अ.क्र.प्रवर्ग२ जनावरांचा गट (रक्कम रुपयात)
शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ टक्के६३,७९६
स्वहिस्सा अनुसूचीत जाती २५ टक्के २१२६५. ३३
शासकीय अनुदान सर्वसाधारण ५० टक्के४२,५३१
स्वहिस्सा सर्वसाधारण ५० टक्के४२,५३१

रेशन कार्ड महाराष्ट्र माहिती, कागदपत्र

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे –

  • फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
  • सातबारा (अनिवार्य)
  • ८ अ उतारा (अनिवार्य)
  • अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
  • आधारकार्ड (अनिवार्य )
  • ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
  • अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
  • रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
  • दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
  • बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
  • रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)
  • दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
  • बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
  • वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
  • शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
  • रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
  • प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

खावटी अनुदान योजना महाराष्ट्र २०२२

दुधाळ गाई किंवा म्हशीचे वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी ची कार्यपद्धती काय आहे?

  • अर्जदाराला सर्वप्रथम महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाच्या पोर्टल वर नोंदणी करून घ्यावी लागेल.
  • यानंतर दुधाळ गाई किंवा म्हशीचे वाटप या योजनेसाठी अर्ज करावा लागेल.
  • मिळालेल्या अर्जामधून स्क्रुटीनी किंवा प्राथमिक निवड केली जाईल.
  • निवड झालेल्या अर्जदाराची कागदपत्रे अपलोड करण्यात येतील.
  • यानंतर अंतिम निवड केली जाईल.

दुधाळ गाई किंवा म्हशीचे वाटप अर्ज कुठे करावा?

दुधाळ गाई म्हशी वाटप अनुदान योजनेसाठी ऑनलाइन अर्ज महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या पोर्टल वर म्हणजेच nah.mahabms.com वर स्वीकारले जातात.

Leave a Comment