खावटी अनुदान योजना | खावटी अनुदान योजना महाराष्ट्र | खावटी अनुदान योजना ऑनलाईन अर्ज करा | खावटी अनुदान योजना फॉर्म PDF | खावटी योजना
Khavti Anudan Yojana 2022 : खावटी अनुदान योजना ही महाराष्ट्र सरकारने फार पूर्वी पासून सुरू केलेली योजना होती. परंतु ती काही कारणांसाठी २०१३-१४ मध्ये बंद करण्यात आली होती. परंतु सध्याच्या कोरोना संकटामुळे खावटी अनुदान योजना महाराष्ट्र सरकारने पुन्हा सुरू केली आहे.

खावटी अनुदान योजना 2022 महाराष्ट्र काय आहे?
सदर योजना महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिक यांचेमार्फत राबविली जात असे. त्यासाठी राज्य शासनाकडून आदिवासी विकास महामंडळास निधी उपलब्ध करुन दिला जात असे.
सन १९७८ ते २०१३ पर्यंत राबविण्यात आलेल्या खावटी कर्ज योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील संख्येनुसार ४ युनिटपर्यंत रु.२,०००/-, ५ ते ८ युनिटपर्यंत रु.३,०००/-, ८ युनिटच्या पुढे रक्कम रु.४,०००/- यानुसार वाटप करण्यात येत होते.
खावटी कर्ज योजनेंतर्गत कर्जाचे वाटप ५० टक्के वस्तुरुपात व ५० टक्के रोख स्वरुपात करण्यात येत होते ज्यामध्ये ७० टक्के कर्ज व ३० टक्के अनुदान असे योजनेचे स्वरुप होते.
योजनेचे नाव | Khavti Anudan Yojana 2022 |
राज्य | महाराष्ट्र |
प्रारंभ | १९७८ |
विभाग | आदिवासी विभाग |
लाभार्थी | आदिवासी वर्गातील कुटुंबे |
नफा | ४०००/- रुपयांचे आर्थिक सहाय्य्य |
उद्देश | आदिवासी कुटुंबांना आर्थिक सहाय्य्य करणे |
गुजरात मुख्यमंत्री निदान योजना
खावटी अनुदान योजनेसाठी आवश्यक पात्रता कोणती?
- आधार कार्ड
- शिधापत्रिका
- रहिवाशी प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- जातीचा दाखला
- बँक खात्याचा तपशील
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- अर्जदार अपंग असल्यास प्रमाणपत्र
- अर्जदार विधवा महिला असल्यास पतीचा मृत्यूचा दाखला
- अर्जदार घटस्फोटित महिला असल्यास न्यायालयीन आदेश
विधवा पेंशन योजना 2022 ऑनलाइन आवेदन
खावटी अनुदान योजनेचे वैशिष्टय
- खावटी अनुदान योजना महाराष्ट्र शासनाद्वारे आदिवासी वर्गातील कुटुंबांना आर्थिक सहाय्य्य करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आली आहे.
- खावटी अनुदान योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ यांच्यामार्फत करण्यात येईल.
- या योजनेअंतर्गत सुमारे ११ लाख ५४ हजार कुटुंबांना लाभ दिला जाणार आहे.
- या योजनेसाठी सुमारे ४८६ कोटी रुपयांचे बजेट निर्धारित करण्यात आले आहे.
- या योजनेच्या लाभाची रक्कम DBT च्या साहाय्याने लाभार्थ्याचं बँक/पोस्ट खात्यात जमा करण्यात येईल.
- या योजनेअंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या वस्तू लाभार्थ्याला घरपोच करण्यात येतील.

खावटी अनुदान योजना महाराष्ट्र २०२२ चे फायदे कोणते?
- राज्यातील चार लाख कुटुंबांना याचा फायदा होणार आहे.
- या योजनेमध्ये जिल्हा अधिकाऱ्याने घोषित केलेल्या किंवा मान्य केल्याचे काही महिला आहेत. त्यामध्ये घटस्फोटित महिला,विधवा, भूमिहीन कुटुंबे, अपंग व्यक्तींचे कुटुंब अनाथ मुलांचे संगोपन करणारे कुटुंब असे एकूण ३ लाख या योजनेचा फायदा होणार आहे.
- आदिम जमातीचे २ लाख २६ हजार कुटुंबे यांचा समावेश करण्यात आला आहे.
- भूमिहीन, शेतमजूर त्याचबरोबर वैयक्तिक हक्क धारण करणारे कुटुंबाच्या जवळपास १ लाख ६५ हजार कुटुंबांना या योजनेचा फायदा होणार आहे.
- अशा प्रकारे एकूण आदिवासी समाजतील ११ लाख ५५ हजार लोकांना त्याचा फायदा होणार आहे.
खावटी अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्यात वस्तुरूपाने देण्यात येणारी मदत
खावटी अनुदान योजना महाराष्ट्र
- पिचर
- चवळी
- हरभरा
- वाटाणा
- उडीद डाळ
- तूरडाळ
- साखर
- शेंगदाणे तेल
- गरम मसाला
- मिरची पावडर
- मीठ
- चहापत्ती
खावटी अनुदान योजना महाराष्ट्र 2022 अनुदान रकमेचे विवरण –
- प्रत्येक कुटुंबाला ४ हजारांची रोख रक्कम देण्यात येईल. तिचे वितरण ५०-५० टक्क्यांमध्ये करण्यात आलेले आहे. म्हणजे लाभार्थी व्यक्तीला अनुदानित रकमेपैकी ५० टक्के रक्कम मिळणार आहे आणि त्याचबरोबर ५० टक्के रक्कम वस्तूरुपात मिळणार आहे.
- २,०००/- रुपये किमतीची रोख रक्कम त्या व्यक्तीच्या खात्यामध्ये जमा होणार होणार आहे.
- काही व्यक्तींचे बँकेमध्ये खाते नसते, तर या अकाउंट नसणाऱ्या लोकांसाठी पण त्यांनी एक सोय केलेली आहे. गावांमध्ये डाक विभागात खात्यामध्ये जर त्याने अकाउंट असेल, तर त्या अकाउंट मधून त्यांना ते २,०००/- रुपये मिळणार आहेत. बाकीचे २,०००/- रुपयांचा वस्तू स्थितीमध्ये फायदा होणार आहे.
- कुटुंबातील प्रमुख महिला आहे तिला २,०००/- रुपयांच्या किराणामाल देण्यात येतो. त्याच्यामध्ये मटकी, चवळी, हरभरा, तेल, डाळी यासारख्या वस्तू आहेत त्या त्या व्यक्तीच्या महिलेच्या हातामध्ये सोपवण्यात येईल. अशाप्रकारे त्या कुटुंबाला या योजनेचा फायदा होणार आहे.
खावटी अनुदान योजनेच्या अटी
Khavti Anudan Yojana Terms & Condition
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- शासनाने निर्धारित केलेल्या वर्गातील कुटुंबांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
महाराष्ट्र रोजगार हमी योजना 2022
खावटी अनुदान योजना महाराष्ट्र 2022 रजिस्ट्रेशन (अर्ज प्रकिया, यादी) कुठे करायचे?
गावांमध्ये ग्रामसेवक असतो आणि ग्रामसेवकाकडे तुम्ही जर गेले तर तिथे तुम्हाला त्याच्याकडे जाऊन या योजनेबद्दल माहिती मिळेल. तिथे तो व्यक्ती तुमचा रजिस्ट्रेशन करून घेईल, नोंदणी करून घेईल, यादी जाहीर होते आणि त्याचबरोबर काही गावांमध्ये तलाठी कार्यालय असते. त्या कार्यालयात जाऊन अर्जदार व्यक्तीला नोंदणी करता येणार आहे. ज्या यादीमध्ये लोकांची नाव आहेत त्यांना अनुदान योजनेचा फायदा होणार आहे. अशा प्रकारे तुम्ही या योजनेबद्दल माहिती ती घेतली आणि तुम्ही स्वतःसाठी याचा फायदा करून घेऊ शकतात.
खावटी अनुदान योजना महाराष्ट्र 2022 ऑनलाईन रजिस्ट्रेशन एप्लिकेशन कुठे करायचे?
तुम्हाला महाडीबीटी पोर्टल वरून देखील या योजनेसाठी रजिस्ट्रेशन आणि अर्ज करता येईल. त्यासाठी खालील दिलेल्या महाडीबीटी पोर्टलच्या ऑफिसिअल वेबसाईटच्या लिंक वर जावा. आणि तेथून या योजनेसाठी रजिस्ट्रेशन करून अर्ज करून लाभ घ्या
महाडीबीटी ऑफिसिअल वेबसाईट
- Outer Banks Season 3 Release Date, Premiere, Cast, Episodes
- How to Watch Alice in Borderland Season 2, Release Date And Cast
- Gandhi Godse Ek Yudh 2023 Hindi Movie, Full Star Cast, OTT, Release Date
- Gatta Kusthi Tamil Movie 2022 Star Cast, Box Office, Release Date
- Kuttey 2023 Movie Box Office Full Star Cast, Budget, Release Date