माझी कन्या भाग्यश्री योजना | माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र | भाग्यश्री योजना | माझी कन्या भाग्यश्री योजना बद्दल माहिती | एक मुलगी योजना | माझी कन्या भाग्यश्री | Majhi Kanya Bhagyashree Yojana | Mazi Kanya Bhagyashree Yojana | Mazi Kanya Bhagyashree Yojana Online Form |
Majhi Kanya Bhagyashree Yojana : महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील गरीब कुटुंबातील मुलींसाठी विविध सरकारी योजना राबवित असते त्या योजनांपैकीच एक योजना जिचे नाव Majhi Kanya Bhagyashree Yojana आहे. आज आपण माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेबद्दल सर्व माहिती पाहणार आहोत.

माझी कन्या भाग्यश्री योजना 2022 काय आहे?
महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींचे शिक्षण, आरोग्य यामध्ये सुधारणा करणे, त्यांच्या उज्वल भविष्याकरिता आर्थिक तरतूद करणे, बालिका भृणहत्या रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे आणि मुलां इतका मुलींचा जन्मदर वाढविणे या उद्देशाने राज्यात शासन निर्णय दिनांक 13 फेब्रुवारी 2014 अन्वये “सुकन्या” योजना सुरु करण्यात आली आहे.
योजनेचे नाव | Majhi Kanya Bhagyashree Yojana |
योजनेची सुरुवात | १ जानेवारी २०१४ |
विभाग | बाल विकास विभाग |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबे |
योजनेचा उद्देश | मुलींना आर्थिकदृष्ट्या बळकट करणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
माझी कन्या भाग्यश्री योजनेचे स्वरुप
“माझी कन्या भाग्यश्री” या योजनेमध्ये पुढीलप्रमा 2 प्रकारचे लाभार्थ्यांना योजनेचे लाभ अनुज्ञेय राहतील.
प्रकार-१ चे लाभार्थी | एकुलती एक मुलगी आहे व मातेने कुटुंबनियोजन केले आहे. |
प्रकार-२ चे लाभार्थी | एक मुलगी आहे आणि मातेने दुस-या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे. अशा परिस्थितीत दोन्ही मुलींना प्रकार-२ चे लाभ देय राहतील. मात्र एक मुलगा व एक मुलगी अशी परिस्थिती असल्यास लाभ अनुज्ञेय राहणार नाहीत. |
माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी आवश्यक पात्रता
- अर्जदार कुटुंब महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजना उद्दिष्टे
राज्यातील मुलींचा जन्मदर वाढविणे,त्यांच्या आरोग्याचा दर्जा उंचावणे,त्यांना शिक्षण देणे व बालविवाहास प्रतिबंध करणे या उद्देशाने योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांना आरोग्य शिक्षण देणे जेणेकरून त्या स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील.
- महाराष्ट्र राज्यामध्ये मुलीचे शिक्षण आरोग्य यामध्ये सुधारणा करणे.
- मुलांइतकाच मुलींचा जन्मदर वाढविणे.
- मातेच्या गर्भधारणेच्या वेळी लिंग निवडिस प्रतिबंध करणे.
- बालिका भ्रूणहत्येला रोखणे.
- मुलींच्या आरोग्याकडे भर देणे व त्यात सुधारणा करणे.
- मुलींना शिक्षणाबाबत प्रोत्साहन देणे.
- मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे
- मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे.
- बालिका भ्रूणहत्येला प्रतिबंधक करून मुलीचा जन्मदर वाढविणे.
- मुलींचे कमी वयात लग्न म्हणजेच बालविवाहास प्रतिबंध करणे.
- मुलीच्या चांगल्या जीवनात्मक सुरक्षेबद्दल खात्री देणे.
- मुलींना चांगले शिक्षण प्रदान करणे.
माझी कन्या भाग्यश्री योजना लाभाचे स्वरूप
टप्पा 1 : मुलीच्या जन्माच्या वेळी
- हेतू: मुलीचा जन्म साजरा करण्यासाठी
- अट: मुलीची जन्म नोंदणी करणे आवश्यक
- लाभ:
पहिल्या मुलींसाठी: ५०००/- रुपये
दुसऱ्या मुलींसाठी: २५००/- रुपये
- योजनेअंतर्गत मुलगी व तिची आई यांच्या नावाने संयुक्त बचत खाते उघडण्यात येईल. त्यामुळे रु.१ लाख अपघात विमा व रु.५०००/- पर्यंत
- ओव्हर ड्राफ्टचा लाभ घेता येईल.
- मुलीच्या नावावर शासनामार्फत | एल.आय.सी. कडे रु.२१२००/- चा विमा | उतरविण्यात येईल. तसेच मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर रु.१ लाख विम्याची रक्कम देण्यात येईल.
- आयुर्विमा महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या आम आदमी योजनेअंतर्गत सदर मुलीच्या नांवे जमा केलेल्या रक्कमेतून (Corpus | Rs.२१२००/-) नाममात्र रुपये १००/- प्रतिवर्षी इतका हप्ता जमा करुन मुलीच्या कमवित्या पालकांचा विमा उतरविला जाईल. ज्यात मुलीच्या पालकांचा अपघात/मृत्यू झाल्यास खालीलप्रमाणे लाभ अनुज्ञेय राहतील.
अ) नैसर्गिक मृत्यू : ३००००/- रुपये
आ) अपघातामुळे मृत्यू-७५०००/- रुपये
इ) दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास-७५०००/- रुपये
ई) एक डोळा अथवा एक अवयव अपघातामुळे निकामी झाल्यास ३७५००/- रुपये
उ) आम आदमी विमा योजनांतर्गत समाविष्ट शिक्षा सहयोग योजनेंतर्गत सदर मुलीला रुपये ६००/- इतकी शिष्यवृत्ती प्रती ६ महिने, इयत्ता नववी, दहावी, अकरावी आणि बारावी मध्ये मुलगी शिकत असतांना दिली जाईल.
महाराष्ट्र रोजगार हमी योजना 2022
टप्पा 2 : मुलगी ५ वर्षे वयाची होईपर्यंत प्रत्येक वर्षाच्या शेवटी
- हेतू: दर्जेदार पोषण देण्यासाठी दर दिवशी १ अंडे किंवा दर दिवशी २०० मी.ली.दूध दिले जाईल
- अट: मुलगी जन्मल्यापासून अंगणवाडीतून लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक
- लाभ:
पहिल्या मुलींसाठी: प्रतिवर्षी २०००/- रुपयांप्रमाणे प्रमाणे ५ वर्षांकरिता एकूण १००००/- रुपये
दुसऱ्या मुलींसाठी: दोन्ही मुलींना प्रतिवर्षी १०००/- रुपयांप्रमाणे ५ वर्षांकरिता १००००/- रुपये
टप्पा ३: प्राथमिक शाळेत प्रवेश (इयत्ता १ली ते ५वी)
- हेतू: गुणवत्तापूर्वक पोषण आहार व इतर खर्चाकरिता
- अट: मुलीच्या शाळा प्रवेशाबाबत प्रमाणपत्र तसेच संबंधित शाळेकडून उपस्थिती प्रमाणपत्र आवश्यक
- लाभ
पहिल्या मुलींसाठी: प्रतिवर्षी २५००/- रुपयांप्रमाणे ५ वर्षांकरिता एकूण १२५००/- रुपये
दुसऱ्या मुलींसाठी: दोन्ही मुलींना प्रतिवर्षी प्रत्येकी १५००/- रुपयांप्रमाणे ५ वर्षांकरिता १५०००/- रुपये
टप्पा ४: माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा प्रवेश (इयत्ता ६वी ते १२वी)
- हेतू: गुणवत्तापूर्वक पोषण आहार व इतर खर्चांकरिता
- अट: मुलीच्या शाळा प्रवेशाबाबत प्रमाणपत्र तसेच संबंधित शाळेकडून उपस्थिती प्रमाणपत्र आवश्यक
- लाभ:
पहिल्या मुलींसाठी: प्रतिवर्षी ३०००/- रुपयांप्रमाणे ७ वर्षांकरिता एकूण २१०००/- रुपये
दुसऱ्या मुलींसाठी: दोन्ही मुलींना प्रतिवर्षी प्रत्येकी २०००/- रुपयांप्रमाणे ७ वर्षांकरिता २२०००/*- रुपये
टप्पा 5:वयाच्या १८व्या वर्षी
- हेतू: कौशल्य,विकास,उच्च शिक्षण आणि रोजगार मिळवण्यासाठी
- अट: वयाची १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक व अविवाहित असल्याबाबतचे पालकांचे शपथपत्र
- लाभ: विम्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर १ लाख रुपये देण्यात येतील.त्यापैकी किमान १००००/- रुपये मुलीच्या कौशल्य विकासावर खर्च करणे आवश्यक आहे.
टप्पा ६ :मुलीचा जन्म झाल्यानंतर
- हेतू: आजी आजोबाला प्रोत्साहनपर भेट
- अट: पहिल्या मुली नंतर मातेने कुटुंब नियोजन करणे आवश्यक
- लाभ:
पहिल्या मुलींसाठी : सोन्याचे नाणे देण्यात येईल. (५०००/- रुपये कमाल मर्यादेपर्यंत व प्रमाणपत्र)
दुसऱ्या मुलींसाठी: लागू नाही
टप्पा ७: गावाचा गौरव
- हेतू: मुलामुलींचे विषम असलेले गुणोत्तर १००० पेक्षा जास्त असण्यासाठी प्रोत्सहानपर
- अट: जिल्हाधिकारी यांचे लिंग गुणोत्तराबाबतचे प्रमाणपत्र तसेच सदरची रक्कम गावातील मुलींच्या विकासासाठी खर्च करणे आवश्यक राहील.
- लाभ: ग्रामपंचायतीस ५ लाख इतके पारितोषिक मा. मंत्री, महिला व बाल विकास यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.
माझी कन्या भाग्यश्री योजना आवश्यक कागदपत्रे
- मुलीचे वडील महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे तसेच महाराष्ट्र राज्याचा रहिवासी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक (Domicile certificate)
- मुलीचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र (शाळेचा दाखला, जन्माचा दाखला)
- लाभार्थी कुटुंबाने जर पहिल्या मुलीसाठी अर्ज केला असेल तर मुलीच्या जन्माच्या १ वर्षाच्या आत आई / वडिलांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.
- लाभार्थी कुटुंबाने जर दुसऱ्या मुलीसाठी अर्ज केला असेल तर दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर ६ महिन्यांच्या आत आई-वडिलांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्याचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
- लाभार्थी मुलीचे आधार कार्ड
- सावित्रीबाई फुले योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र
- रेशन कार्ड
- वीज बील
- रहिवासी पत्ता प्रमाणपत्र
- मोबाइल क्रमांक
- उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न ७.५ लाखाच्या आत असणे आवश्यक)
- पासपोर्ट आकाराचे फोटो
माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत
राज्यातील इच्छुक लाभार्थी ज्यांना या MKBY २०२१ च्या अंतर्गत अर्ज करायचा असेल, तर त्यांनी माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अर्ज पीडीएफ महाराष्ट्र शासनाच्या विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर आहे. तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती जसे नाव, आई-वडिलांचे नाव, मुलीची जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर इत्यादी भरावी लागेल.सर्व माहिती भरुन झाल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे फॉर्मशी जोडून तुमच्या जवळच्या महिला व बालविकास कार्यालयात जमा करावी लागतील. अशा प्रकारे आपला माझा कन्या भाग्यश्री योजना मधील अर्ज करावा लागेल.
माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अर्ज | येथे क्लिक करा |
पालकांचे स्वयंघोषणापत्र / हमीपत्र | येथे क्लिक करा |
बालगृहे, शिशुगृहे किंवा महिला व बालविकास विभागाअंतर्गत इतर निवासी संस्था येथील अधिकारी व जिल्हा बालविकास अधिकारी यांच्याकडे करावयाचा अर्ज | येथे क्लिक करा. |
योजनेबद्दल संपूर्ण माहिती | येथे क्लिक करा |